अडावद येथे बारागाड्या उत्सव संपन्न 

0
49

अडावद – येथील वडगाव बुद्रुक -अडावद रोड वरील मेस्को माय, खंडेराव महाराज नावाने गो शाळा पासून ते खंडेराव मंदिर पर्यत बारागाड्या वार शुक्रवार रोजी उत्साहाने ओढण्यात आल्या.

हि रुढी,परंपरा अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी टिकवून ठेवली आहे.

दरवर्षी चैत्र महिन्यातील चावदसला बारागाड्या ओढल्या जात असतात. संध्याकाळ टाईम 6.30 मि.वेळेस सुनिल पाटील हे बगले समाधान कोळी व आबा कोळी यांच्यासह बारागाड्या ओढण्यात आले.यावेळेस खंडेराव महाराज यांचा जयघोषाने अडावद गावात उत्साहाचे वातावरण होते. गो शाळा पासून ते वडगाव बुद्रुक-कमळगाव चौफुली जवळ ग्रामस्थ,आदींसह मोठ्या प्रमाणात बघण्यास गर्दी झाली होती.

Spread the love