जितेंद्र काटे
सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – शेकडो वर्षांची परंपरा येथील श्री विठ्ठल मंदिराची असून जून्या काळापासून हे मंदिर आपल्या परंपरा राखत दरवर्षी काहीना काही नविन उपक्रम राबविण्यात यशस्वी होतात.असाच कोरोना आजाराच्या लाॅकडाऊन चा फायदा येथील तरुणांनी घेतला आणि मंदिराच्या वर भव्य दिव्य सभामंडप तयार करण्यात यश संपादन केले.
येथील श्री विठ्ठल मंदिराच्या वरच्या भागात हाॅल होता मात्र शेकडो वर्षांपासून माती चूना व विटकाम मधील काम असल्याने हळूहळू पडण्याच्या मार्गावर होते.त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर परिसरात राहणाऱ्या सर्व तरुणांनी एकत्र येऊन व व्हाॅटस्अप गृप च्या माध्यमातून गाव सोडून नोकरी व उद्योग व्यवसाया निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आणि पाहता लोकांनी सढळ हाताने मदत केल्याने आज भव्य दिव्य सभामंडप उभा असून सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे व ज्यांच्या माध्यमातून हे कार्य उभे राहिले या सर्वांचे कौतुक केले जात आहे.
आज रोजी दिंडी मुक्काम तसेच विविध कार्यक्रमांसाठी सभामंडप तयार आहे काही किरकोळ कामे अजूनही बाकी असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.












