खेडीभोकरी-भोकरचा कच्चा रस्ता डांबरीकरण करावा

0
45

प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

 

चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी पासून भोकर पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला असून जागोजागी खडी उखडल्याने मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.तसेच हा मातीचा खोलगट व अरूंदरस्ता असुन समोरून येणारे वाहन व पादचारी दिसत नसल्याने रस्त्यावरील फफुट्याचा व सांडपाण्याचा सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे.हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा,अशी मागणी पंचक्रोशितील ग्रामस्थांनी केली आहे.

चोपडा जळगांव (व्हाया भोकर) हा नविनच जिल्हा व राज्यमार्ग झालेला असुन फक्त खेडीभोकरी ते भोकर दरम्यानचा रस्ता अजूनही तसाच कच्चा राहिलेला आहे.दरवर्षी तापी नदीवर हंगामी लाकडी पूल बनवण्यात येत होता.त्यावेळेस ह्या रस्त्यावर मुरूम रेती पाणी टाकुन फफुट्याचा रस्ता पक्का केला जात होता.परंतु ह्यावर्षी पुल न झाल्याने नदीच्या दोन्ही बाजूस चढतीवर धूळ फफुटा वाढल्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत.चोपडा जळगांव नविन रस्ता बनविण्याच्या अंदाजपत्रकात खेडीभोकरी ते भोकर दरम्यानचा रस्ता दुरुस्तीचे काम सुध्दा असेलच.परंतु ठेकेदारासह संबंधित विभागाचे याकडे अक्षम्यं दुर्लक्ष झालेले आहे.जर बजेट मध्ये नसेल तर सा.बां.विभागाने हा रस्ता विशेष निधीतुन त्वरित रूंदीकरणासह डांबरीकरण करावा,अशीही आग्रही मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

दोन्ही गांवातील प्रेतयात्रा नदिवरच येत असतात.

सध्या ह्या खराब रस्त्यावर खुपच फफुटा झालेला आहे.अधुनमधून दोन्ही गांवातील प्रेतयात्रा ह्याच रस्त्याने नदिवर येत असतात.प्रेतासोबत हज्जारों शोकाकुल बांधवांना सुध्दा मरणयातना सहन कराव्या लागतात.त्यासाठी दोन्ही बाजूकडील रस्त्यावर मुरूम रेती पाणी टाकून फफुट्याचा कच्चा रस्ता पक्का करण्यात यावा.याबाबत संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावी.

 

Spread the love