ममुराबाद:- जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शना खाली दिनांक 2 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता असोदा येथे पोलीसांनी मुख्य मार्गावरून पथसंचालन करण्यात आले.
दि.३ मे रोजी रमजान ईद सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतियेच्या निमीत्ताने गावी मरीमातेच्या बारागाड्या ओढल्या जाणार आहेत.सद्यस्थितीत मुस्लीम धर्मियांचा रमजान महिना सुरु आहे.
येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात शांतता राहावी गावात कोणतीही अनुचीत घटना घडु नये यासाठी असोदा, ममुराबाद, आव्हाणे, या गावांनमध्ये रुट मार्च करण्यात आला.
असोदा येथे बस स्टॉप पासुन गावातील वाणी गल्ली, ग्रामपंचायत चौक, विठ्ठल मंदिरा पर्यन्त पथसंचलन करण्यात आले. त्याचप्रमाणे ममुराबाद येथे छत्रपत्री शिवाजी महाराज प्रवेश द्वारापासुन दत्तमंदिर चौक, मस्जीद, मरीमाता चौक, गणपती मंदिर, मारोती मंदिर, गावहाळ शेजारी कानळदा रस्त्यावर पंथसंचालनाची सांगता झाली.
तसेच आव्हाणे येथे बाबासाहेबांच्या प्रवेश द्वारापासुन , ग्रामपंचायत कार्यालया पर्यन्त पथसंचलन करण्यात आले.या पथसंचालनात तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनात 1 R C P प्लाटून,15 अंमलदार,12 होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक जळगाव व तीन पोलीस वाहनांचा समावेश होता.












