जळगाव – सामाजिक कार्य असो किंवा विविध योजना असो, यासाठी राजकीय वरदहस्त होणे गरजेचे असल्याने कंजरभाट समाजाच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार यांनी केले.
उत्कृष्ट संघटन कौशल्याबदल खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते नरेश पवार यांचा सन्मान करण्यात आले.
मुबंई येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलतर्फे कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात पक्षाच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यासाठी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नंदुरबार येथील राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलचे अध्यक्ष अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाकाळात विविध उपक्रम राबविण्यात आले होते.त्यामुळे नरेश पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड,आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेश पवार यांचे कंजरभाट समाजाचे नरेश बागडे, राहुल नेतलेकर, यांच्यासह राज्यभरात अभिनंदन करण्यात येत आहे.












