धनगर समाज बांधवांची सहविचार सभा रावेर येथे संपन्न

0
44

रावेर प्रतिनिधी—राजेंद्र महाले-– तालुक्यातील धनगर समाज बांधवांची सहविचार सभा अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी साजरी होणाऱ्या जयंती निमित्त रावेर येथे आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कोरोना, अपघाती व नैसर्गिक कारणांमुळे निधन पावलेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली. त्या नंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा व विविध क्षेत्रात नवनियुक्त पदाधिकारींचा सन्मान करण्यात आला त्यात रावेर येथील प्रसिद्ध सोनोग्राफी तज्ञ डॉ.ताराचंद सावळे, पुनखेडा विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पाचपोळे, संचालक नारायण पाचपोळे, रावेर शिक्षक पतपेढीचे संचालक पंडित सर, सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ अजलसोंडे या सर्वांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रावेर पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश धनके हे होते, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, डॉ ताराचंद सावळे, जिल्हा उपाध्यक्ष लखन सावळे, स्वप्निल सर, जगन्नाथ अजलसोडे, युवराज सावळे, बाळू लासुरे, जयेश कुयटे, पंडित धनगर, राजू पाचपोळे, मोहन कुयटे, नारायण पाचपोळे, प्रा.दिलीप सोनवणे, चंद्रकांत वैद्यकर, योगेश धनके, चैतराम धनके, कैलास पासपोळे, गजानन सर, श्रीकांत सपकाळे, निलेश बोरसे यांन सह मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते. ३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व शांततेत प्रत्येक गावामध्ये कशाप्रकारे साजरी करतायेईल या विषयवर सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी मान्यवरांनी योग्य ते मार्गदर्शन केले मोठ्या उत्साहात ही बैठक पार पडली प्रत्येक घरावर झेंडा लावा व प्रत्येक घरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी करण्याच्या सूचना समाज बांधवांना देण्यात आल्या.

Spread the love