प्राथमिक आरोग्य सहाय्यिका श्रीमती.सुलोचना चौधरी सेवानिवृत्त

0
38

रावेर प्रतिनिधी – राजेंद्र महाले

रावेर –  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यीका श्रीमती सुलोचना सुरेश चौधरी यांचे ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर दिनांक ३१ मे रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या.त्या मुळच्या भालोद येथील रहिवाशी असुन खिरोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातुन सेवेला सुरवात केली होती . या नंतर त्यांनी लोहारा,चिनावल,तपतकठोरा आणि शेवटी निंभोरा अशा विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमधे सेवा बजावली.त्यांना त्यांच्या या सेवापुर्ती निमित्त परिसरातुन भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.त्यांच्या या सेवापुर्ती कार्यक्रमा प्रसंगी निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅक्टर तसेच त्यांचे सर्व सहाय्यक व आरोग्य कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते.

Spread the love