आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व कर्मचारी बांधवांची राज्यस्तरीय बैठक 

0
196

अकोला –  येथे दिनांक- १९ जुन २०२२ रविवार रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सभागृह श्री. महर्षी वाल्मिकी शिक्षण संकुल, जुने ग्रामपंचायत कार्यालया जवळ गौरक्षण रोड , मलकापूर अकोला येथे

महाराष्ट्रातील टोकरे कोळी,कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, हलबा, मन्नेवार, मनैरवारलू,ठाकुर,ठाकर यांच्यासह इतर ३३ अन्यायग्रस्त जमाती व आदिवासी कोळी महासंघ , आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे

या राज्यस्तरीय बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आदिवासी नेते माजी कॅबिनेट मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य माननीय

डॉ. दशरथजी भांडे साहेब , मा.अँड. सुशांत येरमवारसाहेबअँड. प्रतापजाधववर साहेब

मा . हेमंत पवार साहेब (सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी) उपस्थित राहणार आहेत यावेळी संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष , कर्मचारी जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा , प्रमुख नेते  मनोगत मांडतील . सरते शेवटी अन्यायग्रस्त आदिवासी जमातींच्या विविध प्रश्नां विषयी संघटनेचा न्यायालयीन व रस्त्यावरील निर्णय जाहीर केला जाईल.

या राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र शासन व आदिवासी विकास विभाग , आदिवासी संशोधन संस्था पुणे व तपासण्या समित्या, सामान्य प्रशासन विभाग यांच्या बेजबाबदार व मनमानी कारभारावर संघटनेच्या वतीने लगाम लावण्यासाठी व सरकार व लोकप्रतिनिधींचे डोकं ठिकाणावर आणण्यासाठी बैठकीमध्ये संघटनेची रणनिती ठरवून निर्णय घेण्यात येणार आहे .जात प्रमाणपत्रासाठी प्रांत अधिकारी जानून बुजून १९५० च्या पूर्वीचा जातीचा नोंद असलेला च महसूली पुरावा मागतात व प्रकरणे फेटाळले जातात

तपासण्या समित्या यांकडे कुठलेही संशोधन नाही ज्यांना प्रांत अधिकारी यांनी नियमानुसार जातप्रमाणपत्र दिले. व नियमानुसारच तपासणी समित्यांनी ही यापूर्वी वैधता दिल्या आहेत त्या वैधता रद्द कश्या करता येतील यासाठी प्रमाण पत्र धारकांना तुमचे वैधता रिओपन करून कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत आजही देत आहेत हे एक वैधता रद्द करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे यावरही या बैठकीत माननीय मान्यवरांकडून कायदेशीर मार्गदर्शन केले जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचा अधिसंख्य पदाचा जि आर व त्यावर औरंगाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात कायदेशीर व मुद्देसूद मार्गदर्शन तसेच कर्मचारी बांधव, सेवा निवृत्त कर्मचारी बांधवांच्या गंभीर प्रश्नावर आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती पूर्ण ताकदीने जिल्हा प्रशासन व मंत्रालयीन स्तरावर जोरदार पाठपुरावा करत आहे संघटनेला विश्वास आहे की आपल्याला न्याय मिळेल याबाबत सविस्तर माहिती या बैठकीत दिल्या जाणार आहे. संघटनेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारींचा सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात येईल

या राज्यस्तरीय बैठकीला आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा मालेगाव भुसावळ तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्र विभागातून अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील

माजी मंत्री आदरणीय 

डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे होत असलेल्या राज्य स्तरीय बैठकीत अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमात बांधवांनी आपल्याला आरक्षण न्याय, संविधानाने दिलेला हक्क मिळवण्यासाठी तसेच  .आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती चे उत्तर महाराष्ट्रातील सर्व नेते , कायदेशीर मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष कर्मचारी जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष युवक जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष, प्रवक्ते , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व नम्र विनंती

प्रल्हाद सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती

मो नंबर  – 8421711919

Spread the love