निंभोरा ग्रामपंचायतीत कामे होत नसल्याच्या कारणावरून व मनमानी कारभारामुळे मासिक सभेवर 17 पैकी 14 सदस्याचा बहिष्कार

0
47

ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बदलीची एकमुखी १४ सदस्यांची मागणी.

रावेर प्रतिनिधी–राजेंद्र महाले तालुक्यातील निंभोरा बु’
येथील १७ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या कारभारात मनमानी व कामे होत नसल्याच्या कारणावरून असंतोष निर्माण झाला असून याबाबत दि.२५रोजी संध्याकाळी सरपंच व उपसरपंच यांच्या व्यतिरिक्त सर्व १४ सदस्यांनी या बैठकीस उपस्थिती दिली .यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी गावकारभारातील अडचणींचा पाढा वाचला.
गावातील कृषी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ग्रामसेवक मुख्यालयी हजर राहत नाही,
ग्रामपंचायत विकास कामात सदस्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही, स्वतः निर्णय परस्पर घेतात ,चौदाव्या वित्त आयोगातील नियोजित आराखड्यानुसार आतापर्यंत ही निधी खर्च का होत नाही,सफाई कामगार वर कोणतेही नियंत्रण नाही, गावात अस्वच्छतेचा कळस असून
जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या.निंभोरा गावाची कर आकारणी व थकबाकी वसुली कडेही दुर्लक्ष होत आहे.तसेच ग्रामपंचायतीतील ग्रामसभेत झालेल्या ठरावांवर अंमलबजावणी न होता त्यांना केराची टोपली दाखविली जात असल्याच्या संतप्त भावना सदस्यांनी बोलून दाखविल्या.यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करण्याची एकमुखी मागणी उपस्थित सर्व सदस्यांनी या पत्रकार परीषदेत केली.तसेच गावात मागील वर्षी टाकण्यात आलेली ०८ लाख रुपयांची खडी ही आम्हाला कोणतीही माहिती न देता कोणाचीही मागणी नसतांना टाकल्याचे सदस्यांनी सांगितले.व याच कारणांवरून दि.२८ रोजी होणाऱ्या मासिक बैठकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.
*या सदस्यांनी केली लेखी निवेदनाद्वारे मागणी*
माजी सरपंच तथा ज्येष्ठ सदस्य श्री डिगंबर दादा चौधरी,श्री सतीष नाना पाटील,श्री मनोहर तायडे,श्री अमोल खाचणे,शेख दिलशाद,सौ.रेखा कोळंबे,सौ.संगीता राणे,सौ.निर्मला कोळी,मंदाकीनी ब-हाटे,श्री स्वप्नील गिरडे,सौ.सुनंदा बि-हाडे,शाहीनबी दस्तगिर खाटीक,सायराबी युनूस खान,मिनाज अकील खाटीक या १४ सदस्यांच्या सह्या असलेले प्रसिद्धीपत्रक यावेळी त्यांनी पत्रकारांना दिले.या बैठकीस सदस्यांसोबत प्रतिनिधी म्हणून युनूस खान,ललित कोळंबे,विशाल तायडे,धनराज राणे,यशवंत ब-हाटे,अकिल खाटीक,दस्तगिर खाटीक यांचीही या बैठकीस उपस्थिती होती.

Spread the love