जळगाव : शहरातील मास्टर कॉलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी 40 हजारांचा ऐवज लांबवला. सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची बाब गुरुवारी उघड झाली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
मेहरून्नीसा शेख नियाजोद्दीन (56, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचा मुलगा तौफिक व सून हे दोघे नगरदेवळा, ता.पाचोरा येथे कामाच्या निमित्ताने गेल्याने मेहरून्नीसा शेख या शेजारी राहणार्या पुतण्याकडे गुरुवार, 28 जुलै रोजी रात्री झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या घराला कुलून होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही बाब शुक्रवार, 29 जुलै रोजी सकाळी उघडकीला आली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.










