महेंद्र सोनवणे
ममुराबाद -:15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ममुराबाद ग्रामपंचायत तर्फे सार्वजनिक ध्वजारोहण गावातील विद्यमान सैनिक मनीष पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालया मध्ये करण्यात आले.त्या नंतर जि प उर्दुशाळेत गामपंचायत सदस्य एजाज पटेल यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. जि प सेमी इंग्लीश स्कूल येथे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष कोळी यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले,
https://youtu.be/3W7ZVFgHOvE
त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्ती गीतावर जि प उर्दू शाळा व जि प सेमी इंग्लिश स्कूल च्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे मन जिंकले.
या ध्वजारोहण कार्यक्रमास सरपंच हेमंत चौधरी,उपसरपंच संतोष कोळी, सदस्य अमर पाटील, एजाज पटेल, शैलेश पाटील, आनीस पटेल, विलास सोनवणे,महिला सदस्या सौ सुनिता चौधरी, आरती पाटील, रंजना ढाके, साधना चोधरी, प्रितम पाटील, तलाठी पालवे, ग्रामसेवक उशीर, ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर सावळे, बुधा सोनवणे, नितीन देवरे, राजरत्न साळुंके, यश गोसावी, महेश अत्तरदे, दिलीप सावळे,छोटु सोनवणे, किरण साठे, सर्व आंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा वर्कर, सर्व शाळेचे शिक्षक वृंद, विविध संस्थेचे पदाधिकारी, तसेेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जि प सेमी इंग्लिश स्कूल च्या उपशिक्षीका सौ कल्पना गुलाबराव चौधरी यांनी स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 स्वातंत्र्यवीर क्रांतिकारकांच्या शौर्य कथा सौ कल्पना चौधरी यांनी त्यांच्या आवाजामध्ये तयार केलेली आहे. स्वतंत्र लढ्याची शौर्यगाथेची सुरुवात दिनांक 15 आगस्ट 2021 रोजी केली होती. व आज दिनांक 15 आगस्ट 2022 रोजी त्या शौर्यगाथेचा समारोप करण्यात आला. यावेळी ऑडीओ क्लिपचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच श्री हेमंत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.










