ममुराबाद-:आज दिनांक 9 ऑक्टोबर २०२२ रोजी जि . प प्राथमिक सेमी इग्लिश स्कूल,ग्रामपंचायत कार्यालय,पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, ममुराबाद ता .जि . जळगाव येथे आद्यकवी महर्षी वाल्मिक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महेंद्र सोनवणे,गोरख कोळी, कृष्णा सोनवणे,विकास कोळी, संदीप कोळी, राजेंद्र कोळी, संदीप शांताराम कोळी, चंद्रकांत कोळी, संतोष कोळी, दिगंबर कोळी,ईश्वर कोडी, सागर कोळी,ललित सोनवणे,

इत्यादींची उपस्थिती होती.त्याचप्रमाणे जि प सेमी इंग्लिश स्कूल मध्ये साजरी करण्यात आलेल्या महर्षी वाल्मिक जयंती च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री . अविनाश पितांबर मोरे यांनी स्विकारले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीम कल्पना चौधरी यानी केले . कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली . विद्यार्थ्यांनी आपले विचार खुपच सुंदर रित्या मांडले . कार्यक्रम प्रसंगी श्रीम ज्योती महाजन मॅडम यांनी विचार मांडले . अध्यक्षांनी आद्य महर्षी वाल्मिकी यांच्याविषयी आपले विचार मांडले . आभार सौ . जैसवाल मॅडम यांनी मानले या प्रसंगी शाळेतील शिक्षीका श्रीम . आरती चौधरी श्रीम . स्वाती पाटील श्रीम पुनम शिंपी श्रीम प्रिती चौधरी व श्रीम .बधान मॅडम उपस्थित होत्या.










