जळगाव -:शहरातील वार्ड नंबर ३९ शॉप नंबर ७९नविन जोशी कॉलनी मधील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय अन्न योजनेचा व प्राधान्य कुटुंब योजने मार्फत शिधाधारकांना दिवाळी आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष व लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुर दृष्टी राज्यभरातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या शिधा धारकांना दिवाळी आनंदाची व गोड जावी या साठी शिधाधार कुटुंबाला चना दाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो, पामतेल १ लिटर असा ऐकून शिधा शंभर (१००) रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जळगाव शहरातील नवीन जोशी कॉलनी वार्ड नंबर ३९ शॉप नंबर ७९ या स्वस्त धान्य दुकानाचे संचालक भिकन जोशी यांनी आनंदाचा शिधा किट आल्यानंतर कुठलाही अवलंब न करता तात्काळ पात्र शिधा धारकांना तहसील कार्यालयाचे एस आय ओ धान्य पुरवठा अधिकारी डी. बि जाधव साहेब, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बालानी यांच्या हस्ते शिधाधारकांना आनंदाचा शिधा किट वाटपाची सुरुवात करण्यात आली. दीवाळी चा घेतांना ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. सर्व ग्राहकांनी स्वस्त धान्य दुकानाचे संचालक भिकन जोशी व अधिकाऱ्यांचे आभार मानले.










