वराडसिम विज कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी  बसविले नविन रोहित्र !

0
41

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील गावठाण भागातील बबलू हार्डवेअर जवळील विज रोहित्र दि २५ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान जळाले त्या त्या भागातील नागरीक हैराण झाले आणि एक दोन दिवस अंधारात राहण्याची वेळ येते की काय असे वाटत असताना वराडसिम विज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी तातडीने दखल घेत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला त्यामुळे उपकार्यकारी अधिकारी श्री धांडे साहेब , जितेंद्र अवचारे व सुनसगाव येथील कनिष्ठ अभियंता देवयानी शेटे लाईनमन राजेश आटक , नितीन तळेले व कर्मचारी यांनी दुपार पर्यंत नविन रोहित्र या ठिकाणी बसविले . त्यामुळे कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी लक्ष दिल्यास तात्काळ कार्यवाही होऊ शकते याचे उदाहरण वराडसिम येथील ग्रामस्थांना पाहायला मिळाले .या कामगीरी मुळे मात्र विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

Spread the love