ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

0
45

धरणगाव -:तालुक्यातील अनोरे येथील ग्रामपंचायतमधील ग्रामरोजगार सेवकाला एकाने रस्त्याच्या कामाच्या वादातून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अनोरे येथील ग्रामपंचायतमधील ग्रामरोजगार एकनाथ बाबूलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता रस्त्यावर पाणी मारत असतांना काही एक कारण नसतांना जितेंद्र दोधू पाटील (रा. अनोरे ता. धरणगाव) याने जवळ येत जोरजोरात ह्या रस्त्यांचे काम कोण करतं? ते मी बघतो असे बोलून शिवीगाळ करुन चापट्याबुक्यांनी मारहान केली. या मारहाणीत डाव्या हाताच्या अंगठ्याला जोरात चावा घेत रस्त्यांवर ढकलून दिल्याचे देखील एकनाथ पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भादवि कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ ईश्वर शिंदे हे करीत आहेत.

Spread the love