बाला उपक्रमांतर्गत “तालुकास्तरीय प्रेरणा सभा” थाटात सपन्न

0
39

महेंद्र सोनवणे

नशिराबाद-आज दि. 17-02-2023 रोजी नशिराबाद उर्दू कन्या शाळा नं. १ येथे तालुकास्तरीय प्रेरणा सभा थाटात संपन्न झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि.प. चे माजी उपाध्याक्ष श्री लालचंदभाऊ पाटील होते, प्रसंगी जि.प. चे माजी शिक्षण सभापती श्री कमलाकर रोटे, उपशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र सपकाळे, शि वि अ जि.प. श्री विजय पवार तसेच गटविकास अधिकारी श्री शशिकांत सोनवणे, गट शिक्षण अधिकारी श्री फिरोज पठान साहेब, शि वि अ श्री खलील शेख साहेब, शि.वि.अ. श्री जितेंद्र चिंचोले, शा.व्य.स. अध्यक्ष व सदस्य इत्यादी मान्यवर बरोबरच जळगाव तालुक्याचे सर्व केंद्रप्रमुख, सर्व बाला मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

प्रेरणा सभेत जि.प. ममुराबाद शाळेच्या शिक्षिका श्रीमती कल्पना चौधरी यांनी आपल्या शाळेच्या बाला उपक्रमाचे PPTद्वारा उत्कृष्ट सादरीकरण केले म्हणून मान.गटविकास अधिकारी जळगाव व इतर मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

Spread the love