साकेगाव – निंभोरा येथे भुसावळ तालुका पोलीसांचा रुट मार्च !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – दिनांक 27. 5.2026 रोजी संध्या. 17:30 ते 19:30 वाजेपावेतो बकरी ईद सणाच्या अनुषंगाने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील साकेगाव व निंभोरा बु. येथे दंगा काबू योजना व रूट मार्च घेण्यात आला. साकेगाव येथे मरिमाता चौक – भवानीनगर – पोळा मैदान – पटेल गल्ली – मरिमाता चौक तसेच निंभोरा बु. येथे गैबन शाह वाली बाबा दर्गा – ग्राम पंचायत – शिवाजीनगर – सर कॉलनी – चेतन हॉटेल या मार्गाने रूट मार्च घेण्यात आला. सदर वेळी पो. स्टे चे 01 अधिकारी व 15 अंमलदार तसेच 25 होमगार्ड यांच्यासह रूट मार्च घेण्यात आला.

Spread the love