भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी एक लाखांची मागणी; खासगी व्यक्ती ACBच्या ताब्यात

0
3

भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली. या प्रकरणात अमन जसबिंदर सनसोये (वय ३६, रा. दीप नगर, भुसावळ) या खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ACBच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

ACBच्या माहितीनुसार, तक्रारदारासह अन्य तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी चौघांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये, अशी एकूण १ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती.

तक्रारीची ACBकडून पडताळणी करण्यात आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आरोपी म्हणून अमन जसबिंदर सनसोये याचे नाव नमूद असून, त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक हेमंत नागरे हे सापळा अधिकारी, तर पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर हे पर्यवेक्षक अधिकारी म्हणून कार्यरत होते. पोलीस नाईक, पोलीस हवालदार तसेच इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Spread the love