भुसावळच्या लक्ष खुशलाणीची विश्वचषकासाठी निवड !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथील विद्यार्थी लक्ष सुरेश खुशलानी याची १२ व्या पेसापल्लो विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सिडनी येथे होणाऱ्या या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

यावेळी ना.संजयभाऊ सावकारे , प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे , शिक्षण विभागाचे राजेंद्र आवटे ,गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी धाडी साहेब , भाजपा जिल्हा सचिव भालचंद्र पाटील ( सुनसगाव ) , शारिरीक शिक्षण विभागाचे प्रदिप साखरे सर यांनी लक्षचा सत्कार करून त्याचे कौतुक केले असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलतांना मंत्री संजयभाऊ सावकारे म्हणाले की लक्ष खुशलाणी च्या यशामुळे

भुसावळच्या शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे . असे खेळाडू आपल्या भागात असल्याने आनंद वाटतो.

यावेळी उपस्थित युवकांना प्रोत्साहन मिळाले असल्याचे प्रदीप साखरे यांनी सांगितले.

Spread the love