गोजोरे व वांजोळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप !

0
5

प्रतिनिधी जितेंद्र काटे

भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे व वांजोळे येथील जिल्हा परिषद शाळेत रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० यांच्या पुढाकारातून आणि वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयभाऊ सावकारे यांच्या मोलाच्या आर्थिक सहकार्याने दि. ३० जुलै रोजी, जिल्हा परिषद शाळा गोजोरे येथे ४८ विद्यार्थ्यांना, तर जिल्हा परिषद शाळा वांजोळे येथे ३५ विद्यार्थ्यांना अशा एकूण ८३ विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ झाला असून, नवीन स्कूल बॅग मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शाळांच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तसेच वस्त्रोद्योग मंत्री ना . संजयभाऊ सावकारे यांचे मनःपूर्वक आभार मानत या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला रोटरियन सुनील पाटील, रोटरियन विकास पाचपांडे, रोटरियन हरविंदर सिंग ठेठी, रोटरियन श्रीकांत जोशी, डॉ. वृषाली चौधरी आणि रोटरियन अनिल साहनी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे यापूर्वी चार जिल्हा परिषद शाळांमध्ये २१९ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले होते. या ८३ विद्यार्थ्यांसह आतापर्यंत एकूण ३०२ विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या वेळी सुनील सिताराम पाटील यांनी उजेड पेरणारी माणसं ही पुस्तके भेट दिली .

यावेळी गोजोरे लोकनियुक्त सरपंच सौ.नंदा कोळी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान कोळी , उपसरपंच चंद्रकांत पाटील , सदस्य भास्कर थोडे , मुख्याध्यापक बाविस्कर सर , धनराज वाघ तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love