गोजोरे विकासोची सर्वसाधारण सभा शांततेत !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची सर्वसाधारण सभा चेअरमन कमलाकर सुरेश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. यावेळी विकासोचे गट सचिव ज्ञानेश्वर धनगर यांनी सुत्रसंचलन केले तसेच शासनाच्या सर्व परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. अजेंड्यावर असलेले १ ते ९ विषय वाचून चर्चा करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला शहिद जवान , तसेच राजकीय पदाधिकारी आणि माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. चेअरमन कमलाकर कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले.

Spread the love