गोजोरे ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बोअरवेल झाल्याने पाण्यासाठी वणवण थांबणार !

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे येथे पिण्याच्या पाण्यासाठी वाघुर धरणाच्या नजिकच विहीर खोदून पाईप लाईन आणण्यात आली आहे. एककेळी गोजोरे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती परंतु धरणावरून पाणी आणल्याने वणवण थांबली.मात्र पाईप लाईन लांब अंतरावर असल्याने अनेकदा पाईप लाईन फुटणे तसेच विजपुरवठा खंडीत होणे असे प्रकार घडत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे गोजोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक लक्ष्मण कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बोअरवेल करण्याचे ठरवून दि. ३ ऑक्टोबर २६ रोजी गोजोरे गावात गावहाळ विहीर जवळ पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायत मार्फत बोअरवेल करण्यात आली. सुदैवाने पाणी खूप मोठ्या प्रमाणावर लागलेले आहे. बऱ्याचदा वाघुर कॉलनी वरील मोटर काही कारणास्तव बंद असते त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. त्यामुळे आता पाणीपुरवठा हा अखंडितपणे गावात चालू राहील. त्याचप्रमाणे येणाऱ्या वेळेत कोळीवाड्यात समाज मंदिराजवळ एक बोअरवेल करण्याचे नियोजन असून येत्या आठ दहा दिवसांत बोअरवेल करण्यात येणार आहे तसेच पंचायत समिती भुसावळ मार्फत दोन हात पंप बसवणार आहेत .अशाप्रकारे गावात जिथे जिथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी वार्डानुसार पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणार असल्याचे समजते. यावेळी सरपंच सौ नंदा लक्ष्मण कोळी यांनी दै.देशदूत शी बोलताना सांगितले की पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात वादळी वाऱ्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडथळे येत असतात मात्र आता आपल्या गावालाच पाणी प्राप्त करण्याच्या दिशेने स्वयंभू करत असून येणाऱ्या वेळेत आपल्याला प्रत्येक वार्ड मध्ये गरजेनुसार नियोजन करून पाण्याच्या समस्येवर उपाय करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले. तसेच गोजोरे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून गोजोरे गावाचा सर्वांगीण विकास करणे हाच आपला ध्यास असल्याचे सांगत गोजोरे गावाचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत अधिकारी तसेच सदस्य व सर्व ग्रामस्थांचे आणि खास करुन महिला वर्ग व युवकांचे सहकार्य लाभत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सरपंच पती तथा माजी सैनिक लक्ष्मण कोळी यांनी सांगितले.

Spread the love