गोंभी गावातील शवपेटी चक्क ९९ हजारांची ?

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोंभी गावात शवपेटी घेण्यात आली आहे.

यामुळे गोंभी गावात समाधानाचे वातावरण असले तरी गोंभी गावांसाठी घेण्यात आली असलेली शवपेटी ही प्रशासकीय काळात घेण्यात आली आहे. ही शवपेटी सोहम इलेक्ट्रिक यांच्या कडून घेण्यात आली असून चक्क ९९९१५ ( नव्यान्नव हजार नउशे पंधरा रुपये ) या किंमतीची दाखवली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे की एवढ्या किंमतीची ही शवपेटी आहे काय ? आणि ज्या सोहम इलेक्ट्रिक यांनी ही शवपेटी दिली त्यात इतर शेवपेटी पेक्षा काय सुविधा आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे

Spread the love