जळगाव : ३ हजाराची लाच घेताना धुळ्यातील लेखापाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

0
103

जळगाव – सागवान लाकड्याच्या वाहतुकीसाठी परवाना तयार करून देण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना धुळे येथील वनविभागातील लेखपालला गुरूवारी (दि.११) रंगेहाथ अटक करण्यात आली. किरण गरीबदास अहिरे असे या लेखापालचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील तकारदार रहिवाशी आहेत. त्यांचा लाकुड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी धुळे तालुक्यातील मौजे गरताड येथील शेतकऱ्याच्या शेतातील सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगाची वाहतुक करण्याचे काम घेतले होते. त्यासाठी गरताड येथील शेतक-याने झाडे तोडुन लाकूड वाहतुकीची परवानगी मिळण्यासाठी २१ फेबुवारी २०२४ ते २३. फेबुवारी २०२४ दरम्यान वन क्षेत्रपाल, धुळे (ग्रामीण) यांच्याकडे अर्ज केला होता. याबाबत परवानगी मिळण्यासाठी तकारदार हे धुळे येथील उप वनसंरक्षक कार्यालयात जावून पाठपुरावा करत होते. तेव्हा या कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकूड वाहतुकीच्या परवानगीचे काम करुन देण्यासाठी तकारदार यांच्याकडे ३ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यांनतर लाचलुचपतने सापळा रचून गुरूवारी (दि.११) लेखापाल किरण अहिरे यांना ११ हजाराची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

Spread the love