किशोर सपकाळे महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्काराने सन्मानित !

0
5

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ –  जळगाव येथे प्रादेशिक शिक्षक संघटना, दापोली (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श शिक्षण भूषण पुरस्कार व आदर्श रत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात राज्यभरातील ६९ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये भुसावळ तालुक्यातील फेकरी परिसरातील भारतीय मजूर संघाचे तालुकाध्यक्ष श्री किशोर भगवान सपकाळे यांना “महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार” प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात आमदार सत्यजीत तांबे, किशोर दराडे, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, राज्य सल्लागार प्रदीप सोनवणे, युवा सेना विभागीय सचिव विराज कावडिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविणाऱ्या यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. तसेच जनसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे किशोर सपकाळे यांच्या योगदानाचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षक व समाजसेवक हे समाज परिवर्तनाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले. गुणवंत व्यक्तींचा सन्मान हा समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यस्तरीय सन्मानामुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे फेकरीची राज्यपातळीवरील ओळख अधिक उजळली असून युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Spread the love