प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे काही वर्षांपूर्वी पुरुषांसाठी नवीन मुतारी व शौचालय बांधण्यात आले आहे. याठिकाणी शौचालय आहे मात्र पाण्याची सोय नाही तसेच ज्यावेळी बांधकाम करण्यात आले त्यावेळी पाण्याची टाकी व पाईप लाईन टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. इस्टिमेट मध्ये सुद्धा पाईप लाईन व पाण्याची टाकी होती.परंतु जेव्हा पासून या मुतारी व शौचालयाचा वापर सुरू झाला तेव्हा पासून पाण्याची टाकी व पाईप लाईन कुठेच दिसले नाही त्यामुळे पाईप लाईन व पाण्याची टाकी कुठे गेली ? ठेकेदाराने पाण्याची टाकी बसवली होती की नाही ? इस्टीमेट मध्ये जर पाईप लाईन व पाण्याची टाकी बसविण्याचे सांगितले होते तर याकडे कोणाचेच लक्ष नव्हते काय ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न सुज्ञ ग्रामस्थांना पडला आहे.











