प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भादली बुद्रुक पोलीस पाटील ॲड सौ. राधिका गोपाळ ढाके यांनी दोन पोस्को गुन्ह्यात उत्कृष्ट प्रकारे साक्षी देऊन गुन्हा शाबित करण्यास मदत केली.पोलीस पाटील राधिका ढाके यांच्या या सन्माननीय कामगिरीबद्दल दि.२० ऑगस्ट रोजी श्री केदार बारबोले साहेब यांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भुसावळ येथे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नशिराबाद पोलीस स्टेशन एपीआय योगिता नारखेडे मॅडम व पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.












