प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – पाळधी येथे वाघूर धरण सिंचन लाभधारक समितीच्या सदस्यांनी ना. गुलाबरावजी पाटील यांची रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्या संदर्भात भेट घेऊन निवेदन दिले. व या संदर्भातील निवेदन ना. गिरिषभाऊ महाजन यांना सुद्धा देण्यात आले आहे .राज्यात व जिल्ह्यात अल निनो च्या प्रभावामुळे या वर्षी पावसाळा कमी प्रमाणात झाला. त्या मुळे खरिपातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु जळगाव, जामनेर, व भुसावळ तालुक्यासाठी वरदान लाभलेल्या वाघूर धरणात आज रोजी 73% जिवंत पाणीसाठा आहे. लाभक्षेत्रातील डावा व उजवा कालव्याला जर रब्बी पिकांसाठी पाण्याचे 2 आवर्तन सोडले तर फक्त 3 ते 4% इतकेच पाणी लागते. व त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिके घेण्यास सोईचे होईल. व त्याचप्रमाणे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटेल. या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पाण्याचे आवर्तन सोडणे कामी सहकार्य करावे अशी विनंती सिंचन लाभधारक समितीच्या वतीने दोघं मंत्री महोदयांना करण्यात आली आहे. यावेळी सिंचन लाभधारक समितीचे सदस्य लालचंद पाटील, तुषार महाजन, किशोर चौधरी, मिलिंद चौधरी, राजेंद्र चौधरी, धनराज राणे, अरुण पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.











