सुनसगावात विजयादशमीच्या दिवशी वृक्षारोपण सोहळा !

0
4

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे गेल्या काही दिवसांपासून ग्रामविकास युवा मंच च्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नुकतेच वैदराज भोजूभाऊ महाजन चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे तसेच विजयादशमीच्या एक दिवस अगोदर ग्रामविकास युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी टँकर ने पाणी आणून नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक महिला शौचालयाची साफसफाई केली तसेच विजयादशमीच्या दिवशी श्री हनुमान मंदिर येथे भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर व गोजोरे येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर स्मशानभूमीच्या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गावातील तरुणांनी ठरवले तर आपलं गाव आदर्श व्हायला वेळ लागणार नाही असे पोलीस उप अधिक्षक प्रशांत दरेकर यांनी सांगितले तर गावातील तरुण पिढी गावाचा चेहरामोहरा बदलू शकते असे लक्ष्मण कोळी यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी मुलांच्या अभ्यासिकेत जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ काजल कोळी यांनी मान्यवरांचा सत्कार केला.या प्रसंगी भोजराज कोळी , सदस्य सुनील कंकरे , भागवत कोळी गोजोरे व पदाधिकारी उपस्थित होते. या वृक्षारोपण कार्यक्रमाला गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी केले.

Spread the love