प्रतिनिधी जितेंद्र काटे | भुसावळ
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे श्री कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री दादाजी धुनीवाले यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री दादाजी कुटीया येथून गावात पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी महिलांनी डोक्यावर कळस धारण करून मिरवणुकीत सहभाग घेतला, तर दादाजी भक्तांनी भजन गात भक्तिमय वातावरण निर्माण केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय उत्साहात हा पालखी सोहळा पार पडला. या सोहळ्यामुळे सुनसगाव परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.









