ह. भ. प. भरत महाराज यांच्या कीर्तनाचा होणार कार्यक्रम; समस्त कोळी समाजाच्या वतीने भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
फैजपूर, प्रतिनिधी : आद्यकवी व रामायणकार परमपूज्य महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त रामपूर (फैजपूर) शहरातील महर्षी वाल्मिकी नगर येथे सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य महामंडलेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने व समस्त कोळी समाजाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्यात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येईल. त्यानंतर ह. भ. प. भरत महाराज (म्हैसवाडी) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला श्री सतपंथ देवस्थान, फैजपूर येथील प. पू. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, श्री खंडेराव देवस्थान, फैजपूर येथील प. पू. महामंडलेश्वर पवन कुमारदासजी महाराज, आमदार अमोलदादा जावळे, श्री प्रभाकर आप्पा सोनवणे, श्री नरेंद्रदादा नारखेडे, माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ राणे, श्री पांडुरंगदादा सराफ, पत्रकार नंदू भाऊ अग्रवाल आणि सामाजिक कार्यकर्ते चंदू भाऊ कोळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच फैजपूर शहरातील नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लाभणार आहे.
महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांचे स्मरण करून धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवात भाविकांनी सहकुटुंब व सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन कोळी समाजाचे अध्यक्ष श्री दिलीप भाऊ कोळी यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण : महर्षी वाल्मिकी नगर, वाल्मिकी मंदिराजवळ, फैजपूर.
आयोजक : समस्त कोळी समाज, रामपूर (फैजपूर).
आवाहन : कोळी समाज अध्यक्ष श्री दिलीप भाऊ कोळी.









