ममुराबाद येथे होतोय दुषित पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

0
42

ममुराबाद -: ममुराबाद गावाला नांद्रा गावावरून राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातुन होणारा पाणी पुरवठा दुषित होत असल्याने येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बर्‍याच दिवसा पासुन ममुराबाद गावाला पाणीपुरवठा करणारा फिल्टर प्लांट काही महिन्यापासून नादुरुस्त असल्याने ममुराबादकरांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूण देखील कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना ग्रामपंचायत प्रशासनामार्फत राबविल्या जात नसल्यामुळे नळाचे येणारे पाणी पिण्यालायक नाही. पिण्याचे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतच्या पाणीपट्टीच्या कराव्यतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

गावात होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ आणि चिखलयुक्त होत आहे. याचा विपरित परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांना पोटदुखी, काविळ, चक्कर येणे यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.छोट्या मोठ्या सणासमारंभापासून घरगुती दैनंदिन पाणी पिण्यासाठी सुद्धा आर.ओ. चे पाणी महागात खरेदी करून पिण्याची फॅशनच झाल्यासारखे दिसते.

यासंदर्भात ग्रामसभेमध्ये काही नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या.फिल्टर प्लांट लवकरात लवकर सुरू करावा त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल व आरोग्यास हानी होणार नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Spread the love