दोघांची इच्छा आहे, पण गुण जुळत नाहीत, वरच्या ब्राह्मणाला विचारावं लागेल-गुलाबराव पाटील

0
50

जळगाव –  अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दोघांची इच्छा आहे पण गुण जुळत नाही. वरच्या ब्राह्मणाला विचारावा लागेल. तिथी आलेली नाही.

तिथी लवकरच येईल काळजी करू नका”, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. अजित पवारांचे पक्षांतर अटळ असल्याचं म्हणत राज्यात लवकरच महाभूकंप होणार असल्याचे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. मात्र मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे म्हणत अजित पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला होता. दरम्यान दोघांची इच्छा आहे पण गुण जुळत नाही, त्यामुळे वरच्या ब्राह्मणाला विचारावा लागेल गुण जुळवावे लागतील, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे. काळजी करू नका लवकरच मुहूर्त येईल, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

 

Spread the love