छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा नागपुरात; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा पुढाकार

0
52

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. या पुतळय़ाची उंची तब्बल 32 फूट असून वजन 10 हजार किलो इतके असणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाच्या पुढाकाराने हा पुतळा महाराजबाग परिसरात विराजमान होणार आहे. विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त लोकसहभागातून पुतळा बसविण्यात येत आहे.

असा असेल पुतळा

पुतळय़ाच्या चबुतऱ्याची लांबी 20 फूट, उंची 9 फूट तर रुंदी 15 फूट.

सिंहासनारूढ पुतळय़ाची उंची 32 फूट.

पुतळय़ावरील छत्री 7 फूट.

कास्य धातूपासून बनवलेल्या मूर्तीचे वजन 10,000 किलो.

मूर्तिकार सोनल कोहाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारणार आहेत.

Spread the love