मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिला व बालविकास कल्याण मंत्रालयाच्या एका कार्यक्रमाला हजर राहिले होते. हा कार्यक्रम बुधवारी सायन चुनाभट्टी येथील मैदानात पार पडला.
एवढ्या मोठ्या मैदानात सरकारच्या या कार्यक्रमाला फारच कमी गर्दी झाली होती. त्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचे काही पत्रकार वार्तांकन करत होते. ते बघून भाजपचे कार्यकर्ते भडकले व त्यांनी थेट पत्रकारालाच मारहाण केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला असून राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
मुंबईतील सायन चुनाभट्टी परिसरातील सोमय्या मैदानात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना काही समाजकंटकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. राज्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या… https://t.co/34mloB47tA
— Supriya Sule (@supriya_sule) May 14, 2023
‘मुंबईतील सायन चुनाभट्टी परिसरातील सोमय्या मैदानात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना काही समाजकंटकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. राज्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना मारहाण केली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे.पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी याची तातडीने दखल घेऊन याबाबत कारवाई करण्याची गरज आहे. राजकीय व्यक्तींनी देखील अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांनी देखील कार्यकर्त्यांना आवर घालणे आवश्यक आहे’ असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.











