नथुराम गोडसे हा देशभक्त होता! उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

0
42

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी नथुराम गोडसेविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, त्यांच्या देशभक्तीवर शंका घेतली जाऊ शकत नाही, असं रावत म्हणाले आहेत. बुधवारी उत्तर प्रदेशच्या बलिया येथे रावत यांनी हे विधान केलं आहे.

रावत हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी ते बलिया येथे पोहोचले. बलियात माध्यमांना संबोधित करताना त्यांना राहुल गांधी यांनी केलेल्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. राहुल गांधी यांनी परदेशात काँग्रेस हा गांधीवादी पक्ष तर भाजप गोडसेवादी राजकारण करत असल्याचं म्हटलं होतं. त्याला उत्तर ‘नथुराम गोडसे हे देशभक्त होते, त्यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही’, असं वादग्रस्त विधान रावत यांनी केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, नथुराम यांनी महात्मा गांधींना मारलं तो एक वेगळा मुद्दा आहे. पण, मी जेवढा गोडसे यांचा अभ्यास केला आहे, त्यावरून ते एक देशभक्त होते. गांधीजींच्या हत्येचं समर्थन होऊ शकत नाही, असंही रावत यावेळी म्हणाले.

Spread the love