राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असतानाच दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारू, महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू” अशी धमकी आल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले आहे.
यापूर्वीही संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी पुण्यात एकाला अटक करण्यात आली होती. “गुरूवारी 8 जून रोजी 4 वाजण्याच्या दरम्यान मला तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली.” असे सुनील राऊत यांनी सांगितले.











