माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाळे येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम

0
41

भामलवाडी – संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत भर आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.आणि हा उत्सव श्री क्षेत्र मेहून,आणि पंढरपूर या धार्मिक तीर्थ क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे या उत्सवाला विशेष महत्व प्राप्त होते.आणि म्हणून एक पवित्र उत्सव म्हणून आपण त्याला साजरा करत असतो.महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील वारकरी , ,श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करून एक महिना अगोदर आपापल्या गावातून जात असतात.

अशातच रावेर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे आषाढी एकादशी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विठ्ठल रुक्मिणी सारखीच वेश भूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.गोल गोल रिंगणात हरी नामाचा जयघोष करीत संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक वृंद लीन झाले होते.दोन्ही गावातून वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडी सोहळा पार पडला.यावेळी गावातील भजनी मंडळे,आणि मुख्याध्यापक,शिक्षक , कर्मचारी,आणि सरपंच, उप सरपंच,ग्राम पंचायत सदस्य,आणि गावातील महिलानी सहभाग नोंदवला. अशा प्रकारे पुरी गोलवाडे येथील माध्यमिक विद्यालयाने अथक परिश्रम करून हा उत्सव साजरा केला.

Spread the love