आता कारागृहातील वयोवृद्ध कैद्यांना मिळणार सुखाची झोप, स्वखर्चाने अंथरुण आणि उशी घेण्याची परवानगी

0
42

राज्यातील विविध कारागृहांत बंदिस्त असलेल्या कैद्यांना आता सुखाची झोप घेता येणार आहे. 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांना स्वखर्चाने अंथरुण आणि उशी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

कारागृहांमध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले अनेक कैदी आहेत. त्यामधील काही वयोवृद्ध कैदी आजारी असतात. त्यांच्या प्रकृतीचा विचार करून संबंधित सर्व न्यायाधीन कैद्यांना जाड बेडिंग (अंथरुण)तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कारागृह अधीक्षकांकडून कैद्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर 50 वयापेक्षा जास्त असलेल्या कैद्यांना स्वखर्चाने जाड बेडिंग (अंथरुण) आणि उशी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कैद्यांना आरामशीर झोप घेता येणार आहे. वयोवृद्ध कैद्यांच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कारागृह प्रशासनाने ठोस अंमलबजावणी करावी. संबंधित कैद्यांना त्रास होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्याही सूचना करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने अंथरुण व उशी घेण्याची परवानगी दिल्याने कैद्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषकरून हिवाळा आणि पावसाळय़ात कैद्यांना याचा खूपच फायदा होणार आहे.

राज्यातील मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा, खुले आणि विशेष कारागृहात अनेक वयोवृद्ध बंदिवान आहेत. वेळोवेळी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. विशेषतः त्यांना अंथरुण, उशी मिळाल्यास काही प्रमाणात समस्या सुटण्यास मदत होणार होती. त्यामुळे संबंधित कैद्यांना अंथरुण आणि उशी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबत सर्व कारागृह अधीक्षकांना आदेश पाठविण्यात आला आहे.

अमिताभ गुप्ता, (महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा

Spread the love