उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, पण, ‘हा’ आमदार म्हणाला ते तर ‘बरसाती मेंढक’

0
45

यवतमाळ –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून यवतमाळमधून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. दुपारी उद्धव ठाकरे यांचे यवतमाळमध्ये आगमन झाले. पोहरादेवी येथे बामनलाल महाराज मंदिर येथे त्यांच्या हस्ते होम पूजेमध्ये नारळ अर्पण करून आहुती टाकली जाणार आहे.

त्यामुळे पोहरादेवी येथे सुरक्षेच्या कारणाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे. यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार असून येथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. मात्र, यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागलीय. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केलीय.

Spread the love