चिमुकलीने तोंडात टाकली चार्जरची पिन अन्…

0
43

कर्नाटकातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कारवार तालुक्यात बुधवारी मोबाईल चार्जर चुकून तोंडात अडकल्याने आठ महिन्यांच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला.

या घटनेनंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आणि संजना यांची मुलगी सानिध्या असे या मुलीचे नाव आहे. संतोष हुबळी वीज पुरवठा कंपनीत (हेस्कॉम) कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. कुटुंबीयांनी त्यांचा मोबाईल चार्ज केला होता पण चुकून स्वीच चालूच होता.

दरम्यान चिमुकलीने चार्जरची पिन तोंडात टाकताच तिला विजेचा जोराचा धक्का बसला. यानंतर त्याच्या पालकांनी तिला तात्काळ दुचाकीवरून जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र सर्व प्रयत्न करूनही मुलीला वाचवता आले नाही आणि रुग्णालयाने तिला मृत घोषित केले. प्रकरणी स्थानिक ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Spread the love