गाढ झोपेत मित्रांचा मृत्यूच्या वाटेवर प्रवास; समृद्धीवरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

0
45

विकास आणि समृद्धीचा मार्ग म्हणून बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. ३० जून २०२३ रोजी येथे विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला.

या अपघातात २६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघाताच्या आठवणी पुसट होत नाही तोच समृद्धीवर आणखीन आपघाताच्या घटना समोर आल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यात समृद्धीवर पुन्हा भीषण अपघाताची घटना घडलीये. रात्री एकच्या सुमारास ट्रकचा अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सरद ट्रक नागपूरयेथून मुंबईकडे निघाला होता. रात्रीच्यावेळी झोप लागल्याने पुलाच्या सिमेंट कठड्यावर ट्रॅक धडकला.

समृद्धीवर ट्रक वेगात होता. भरधाव ट्रक इतका जोरात धडकला की ट्रकच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झालाय.

 

Spread the love