खाण कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्ती, कुठे कराल ऑनलाईन अर्ज?

0
49

गोवा, दीव-दमण, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील खाण कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 अर्ज मागविण्यात आले आहेत.

विडी कामगार, चुना आणि डोलोमाईट, लोह-मँगनीज खाणीतील कामगारांच्या पाल्यांसाठी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते.

कोणाला किती शिष्यवृत्ती?

पहिली ते चौथी – एक हजार रुपये

पाचवी ते आठवी – दीड हजार रुपये

नववी ते दहावी – दोन हजार रुपये

अकरावी ते बारावी – तीन हजार रुपये

आयटीआय, पॉलिटेक्निक, बीएस्सी कृषीसह इतर पदवी- सहा हजार रुपये

बी.ई, एमबीबीएस, एमबीएसाठी – पंचवीस हजार रुपये

कुठे कराल अर्ज ?

शिष्यवृत्तीसाठी scholarships.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवरती नोंदणी सुरु झाली आहे. पूर्व मेट्रीक अर्जासाठी 30 नोव्हेंबर आणि दहावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

शिष्यवृत्ती आणि अर्जाबाबत अधिक माहितीसाठी 0712-2510200 या क्रमांकावर किंवा wcngp-labour@nic.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

Spread the love