पाच ते बारा वर्षांच्या विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ईश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये चौथीत शिक्षणाऱ्या तेजश्री यशवंत देशमूख हिने मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीले आहे. तसेच ते त्यांना पाठवण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस प्रवासात पाच ते बारा वयोगटासाठी अर्धे तिकीट आहे. तर 12 ते 65 वयोगटातील पुरुषांनाला पूर्ण तिकीट आहे. तर महिलांना 75 वयोगटापर्यत अर्धे तिकीट आहे. तसेच 75 वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे 5 ते 12 वयोगटातील मुला/मुलींना मोफत एसटी प्रवासाची सवलत देण्यात यावी, अशी मागणी तेजस्वीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. सरकार या मागणीची दखल घेणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.









