सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे 109 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर खर्डी गावी संपन्न

0
51

नंदुरबार -दिनांक २१/०८/२०२१ रोजी सेवाभावे प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विश्व हिंदू परिषदाचे जिल्हा मंत्री श्री विजयराव सोनवणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे शिबिर घेण्यात आले. प्रथम देवमोगरा माता व भारत माता यांचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.

यावेळेस मा सभापती श्री.साखऱ्या दादा पाडवी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे, डॉ.विजय मराठे, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या सोनवणे, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड अध्यक्ष प्रा.राजाराम राणे सर, डॉ.शांतीलाल पिंपरे हे या शिबिरात उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या सोनवणे यांनी केली. यावेळेस सेवाभावे प्रतिष्ठानकडून आलेले पाहुण्यांचे सत्कार करण्यात तसेच समस्त ग्रामस्थ व मा.सभापती यांनी जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ.विजय मराठे यांच्या सत्कार संस्थेचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या सोनवणे यांनी केला. मा सभापती श्री.साखऱ्या दादा पाडवी यांच्या सत्कार संचालक श्री.नकुल ठाकरे यांनी केली. प्रा. राजाराम राणे सर यांच्या सत्कार चि.कल्पेश भारत सोनवणे यांनी केले.डॉ.शांतीलाल पिंपळे यांच्या सत्कार श्री.सुनील मोरे यांनी केला.

यावेळेस विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे म्हणाले की, सेवाभावे ने अतिदुर्गम भागात शिबिर घेऊन गोर गरिबांचे तपासणी केली फार चांगले काम केले व त्यांनी अशीच सेवा कायम द्यावी.

प्राध्यापक श्री.राजाराम राणे सर म्हणाले की, श्री विजयराव सोनवणे जिल्हा मंत्री वि.ही.प यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी असे चांगले लोक उपक्रम लोकहिताचे घेत असतात त्यातील एक उपक्रम या च्या लाभ सर्व गावातील-पाड्यातील माता-बंधूंनी घ्यावा असे आव्हान केले.

सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैया सोनवणे यांनी सांगितले की, या कार्यक्रमाला 10 गावातील-पाड्यातील रुग्ण उपस्थित होते.109 रुग्णांची तपासणी केली व 20 रुग्णांच्या ऑपरेशन ठरले आहे.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक श्री संतोष जगत चौधरी, श्री.नकुल दिल्या ठाकरे,श्री.सुनिल मदन मोरे, श्री चुंबलाल ठाकरे, श्री.सुरपसिंग काला ठाकरे, श्री.कृष्णा सायसिंग ठाकरे, श्री.सांगदेव हरीसिंग वळवी, श्री.किशोर राजा पाडवी, श्री.शांतीराम रामजी वळवी, श्री.राजेश गोरख मोरे, श्री.राजकुमार सुरसिंग ठाकरे, श्री.सोन्या गुरुजी पाडवी,श्री.गबा विठ्ठल राहासे यांनी मेहनत घेतली

या कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संचालक श्री.नकुल दिल्या ठाकरे यांनी मानले.

Spread the love