आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक

0
45

मुंबई – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली. गृह खात्याने आज त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. विवेक फणसळकर यांच्याकडून आता रश्मी शुक्ला पदभार स्वीकारतील.

रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे महासंचालक पदाची धुरा सोपवण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. शुक्ला या येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. सध्या त्या सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून कार्यभार पाहत होत्या.

Spread the love