४ फेब्रुवारी २०२४ रोजी सेवाभावे प्रतिष्ठानची ग्राम समिती रोझवा पुनर्वसन क्र. ४ या गावात जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कर्करोगाविषयी जनजागृती व व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील ग्राम समितीचे उद्दिष्ट होते.या
प्रसंगी रोझवा पुनर्वसन क्र. ४ ग्राम समिती प्रमुख श्री. दिनेश सायका पावरा यांनी स्थानिक बोली भाषेत दारू, तंबाखू व तत्सम पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्याला कशाप्रकारे हानी पोहोचते. व्यसनाधीनतेमुळे आपला परिवार कसा उध्वस्त होतो याविषयी माहिती देऊन जनजागृती केली.
तसेच गोपाळपूर ग्राम समिती प्रमुख श्री. दिलवर पावरा म्हणाले की, कॅन्सर हा असा आजार आहे की ज्याला कोणीही हलक्यात घेणं महागात पडू शकतं. ही अशी स्थिती आहे ज्यामुळे मानवी शरीरातील काही पेशींची नियंत्रणाबाहेर वाढ होत जाते आणि तो अवयव निकामी होतो तसेच शरीराच्या इतर भागात पसरून इतर अवयवांना सुद्धा निकामी करते. यासाठी त्याबद्दल स्वतःला शिक्षित करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
या प्रंसगी श्री. बिपिनसिंग सेगा पावरा, विजय पावरा, चिवल्या पावरा, आकाश पावरा, सारंग पावरा, भिमसिंग पावरा, महेंद्र वसावे, श्री. विजय पावरा, निमजा वसावे, दिलवर पावरा, आकाश पावरा, पिंट्या पावरा, मोग्या पावरा, सुरेश पावरा व गावकरी उपस्थित होते.












