देशभरात निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. आज अनेक ठिकाणी मतदान पार पडत आहे. यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये एका मतदान केंद्राच्या बाथरूममध्ये सीआरपीएफचा जवान रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता.
जवानाच्या डोक्याला दुखापत झाली होती. लोकांनी त्याला पाहिल्यानंतर सीआरपीएफचा जवानाबाबत तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर जवानाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सीआरपीएफ जवानाला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पश्चिम बंगालमधील माथाभंगा येथे निवडणुकीसाठीच्या कर्तव्यावर असलेल्या सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांचे सांगितले की, सीआरपीएफ जवान बाथरूममध्ये पडला होता, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री घडली. माथाभंगा येथील मतदान केंद्राच्या बाथरूममध्ये सीआरपीएफ जवान बेशुद्धावस्थेत आढळून आला. लोकांनी पाहिल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या जवानाच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.
जवान बाथरुममध्ये पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.












