बद्रीनाथमध्ये 23 प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

0
46

रुद्रप्रयाग  – बद्रीनाथ इथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर उलटून भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ महामार्गावर एक मोठा रस्ता अपघात झाला. ट्रॅव्हलर रस्ता सोडून कठड्यावरुन कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हलरमध्ये सुमारे 23 प्रवासी होते.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि पोलिसांचे पथक बचावकार्य करत आहेत. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पथकाने जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बचावकार्य सध्या सुरू आहे.

दिल्लीहून ट्रॅव्हलर 22 प्रवासी घेऊन तुंगनाथला इथे जात असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती सुरू आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, ‘रुद्रप्रयाग जिल्ह्यात ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक घटना समजली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्य करत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Spread the love