जळगाव जिल्ह्यात ओरॅकल च्या सौजन्याने समर्थनम् ट्रस्ट फाॅर दि डिसेबल्ड राबविणार वॉश प्रकल्प.( जिल्हा परिषद शाळांना मिळणार लाभ )

0
93

प्रतिनिधी( जितेंद्र काटे ) – भुसावळ – मागील वर्षापासून समर्थनम् ट्रस्ट ओरँकल ( oracle ) च्या आर्थिक सहकार्याने वॉश ( wash ) प्रकल्प राबवित आहे .या प्रकल्पासाठी समर्थनम् ट्रस्ट गरजू शाळांची निवड करते तसेच या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना शाळेत स्वच्छ वातावरण व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी आणि जनजागृती व्हावी असा आहे.

या प्रकल्पा अंतर्गत निवड केलेल्या शाळांमध्ये शौचालयाचे नुतणीकरण , विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ५० लिटर क्षमतेचे आर ओ प्लँट वॉटर फिल्टर मशिन तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती व्हावी यासाठी सत्राचे आयोजन व किशोरवयीन विद्यार्थींनींना आरोग्य विषयी व स्वच्छते विषयी किट पुरविले जाते अशा प्रकारच्या सुविधा शाळांना पुरविणार आहे .

गेल्या वर्षी जि.प. उर्दू कन्या शाळा नशिराबाद व जि. प. शाळा धानवड ता.जळगाव या दोन शाळांमध्ये वॉश प्रकल्प राबविला होता त्यात शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षण विभाग , पालक ,शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून सहकार्य लाभले होते.

या वर्षी जळगाव तालुक्यातील जि प शाळा रायपूर , जि प शाळा कंडारी ,जि प शाळा विटनेर व जि प उर्दू शाळा ख्वाजानगर नशिराबाद अशा चार शाळांची निवड केली आहे. वॉश प्रकल्पा विषयी निवडलेल्या सर्व शाळांना योग्य प्रकारे माहिती व्हावी यासाठी शिक्षक ,पालक व व्यवस्थापन समितीसाठी नुकतेच कार्यक्रमाचे दि. १० सप्टेंबर रोजी रायपूर शाळेत आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला समर्थनम् ट्रस्ट फॉर दि डिसेबल्ड बेंगलोर च्या वॉश प्रकल्प प्रमुख सौ अमुधा माइकल ,समर्थनम् ट्रस्ट फॉर दि डिसेबल्ड पुणे येथील तुषार बळी व जळगाव जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रतिक काटे तसेच जि.प.शाळा रायपूर च्या मुख्याध्यापिका सौ चित्रलेखा वायकोळे , रायपूर सरपंच सौ. रजनी सपकाळे , जि.प.शाळा कंडारी मुख्याध्यापक तुषार लोहार , कंडारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुस्ताफशाह ,नशिराबाद उर्दू शाळेचे शिक्षक साजिद शेख व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमिनोद्दीन शेख व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समर्थनम् ट्रस्ट फॉर दि डिसेबल्ड चे जळगाव जिल्हा प्रकल्प प्रमुख प्रतिक काटे यांनी केले.

Spread the love